Coronavirus | ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण

 कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात पसरत चालला आहे. कोरोनाच्या या महामारीचा फटका आता ब्रिटनच्या राजघराण्याला देखील बसला आहे. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रिन्स चार्ल्स यांचे कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट आले आहेत. ते आधीपासूनच स्कॉटलंडमध्ये आयसोलेशनमध्ये आहेत. तर त्यांची पत्नी कॅमिला यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. काही दिवसांपूर्वी चार्ल्स यांनी मोनकोचे प्रिंस एल्बर्ट यांची भेट घेतली होती. प्रिन्स एलबर्ट हे देखील आधीच कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola