Afghanistan Blast : काबुल आणि उत्तर अफगाणिस्तान पुन्हा एकदा स्फोटानं हादरलं, 16 जणांचा मृत्यू
काबुल आणि उत्तर अफगाणिस्तान पुन्हा एकदा स्फोटानं हादरलं. अफगाणिस्तानमधल्या या स्फोटांत 16 जणांचा मृत्यू झाला. अफगाणिस्तानची राजधानी काबुल आणि उत्तरेकडचं शहर मजार ए शरीफमध्ये बॉस्बस्फोट करण्यात आले. मजार ए शरीफमध्ये मिनी व्हॅनना लक्ष्य करून त्यात स्फोटकं ठेवण्यात आली. काबुलच्या मशिदीत स्फोट घडवण्यात आले. मजार ए शरीफमध्ये तीन मिनी बसमध्ये स्फोट घडवण्यात आले.