Belgium | सांताक्लॉज आला, कोरोना देऊन गेला; होम केअर सेंटरमधील 157 जणांना कोरोना, 18 जणांचा मृत्यू
कोरोना व्हायरसचं संकट असतानाच सर्वत्र सण उत्सवांमध्येही याचं सावट पाहायला मिळालं. त्यातच अनेक ठिकाणी यंदाच्या ख्रिसमस सेलिब्रेशनलाही आटोपतं घेण्यात आलं. पण, असं असताना कोरोनाच्या दृष्टीनं प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याकडे अनेकांनीच दुर्लक्ष केलं आणि याची शिक्षाही त्यांना मिळाली.
सध्या सोशल मीडियापासून सगळीकडे अशीच चर्चा सुरु आहे ती म्हणजे बेल्जियममधील एका ख्रिसमस सेलिब्रेशन आणि सांताक्लॉजची. सहसा ख्रिसमसच्या दृष्टीनं येणारा सांताक्लॉज (Santaclause) आनंद, उत्साहाची उधळण करत येतो. बेल्जियममध्येही तो याच उद्देशानं आला खरा. पण, जाता जाता तो इथं कोरोनाचा प्रसार करुन गेला.
बेल्जियममध्ये सांताक्लॉजचं गिफ्ट खऱ्या अर्थान महागात पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जिथं अनावधानानं सांताक्लॉज झालेल्या व्यक्तीकडून कोरोनाचा प्रसार झाल्याचं वृत्त समोर येत आहे.