America Bomb Hailstorm : अमेरिकेत 10 राज्यात बर्फाचं वादळ; रस्ते, रेल्वे हवाई वाहतूकही ठप्प

Continues below advertisement

अमेरिकेच्या पूर्व भागात बर्फाच्या वादळानं महासत्तेला अंधारात लोटलं आहे. सुमारे 7 कोटी लोक या संकटात सापडले आहेत. न्यूयॉर्क आणि बोस्टनमध्ये वीज गायब झालीय. त्यामुळे या शहरांतलं जनजीवन थंडावलं आहे. अमेरिकेतील या बॉम्ब वादळानं चिंता वाढवली आहे. बर्फाच्या या वादळानं न्यूयॉर्कमध्ये 4 इंच थर साचलाय. तर किनारपट्टी भागात तब्बल एक फूट बर्फाचा थर साचला आहे. त्यामुळे सुमारे सव्वा लाख घरांची वीज गायब आहे. रेल्वे रुळावर साचलेला बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे रेल्वे सेवाही बंद करण्यात आलीय. बर्फाच्या वादळानं  अमेरिकेतील 10 राज्यांतली जनजीवन विस्कळीत झालीय. रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि हवाई वाहतूकही ठप्प झाली आहे. अमेरिकेत या वादळामुळे तब्बल सहा हजारांवर उड्डाणं रद्द करण्यात आलीत. बोस्टनमध्ये स्नो इमरजन्सी घोषित करण्यात आलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram