Shraddha Murder Case : श्रद्धाच्या हत्येचा आफताबकडून कबूली, कबूलनाम्यातील 10 मुद्दे काय?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShraddha Murder Case: श्रद्धा वालकर मर्डर केसनं अवघा देश हादरलाय. देशाला हादरणाऱ्या या मर्डर मिस्ट्रीबाबत आता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. दिल्लीतील मेहरौली भागात श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं गळा दाबून हत्या केली. पण तो एवढ्यावरच थांबला नाही. त्यानंतर त्यानं मतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले, ते फ्रिजमध्ये स्टोअर केलं. त्यानंतर दिल्लीतील वेगवेगळ्या परिसरात जाऊन ठराविक अंतरानं टाकून दिले. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या खुनाचा उलगडा आता झाला तेव्हा या घटनेतलं कौर्यही समोर आलं. दोघेही मूळचे वसईतलेच होते. श्रद्धाच्या या प्रेमप्रकरणाला तिच्या घरच्यांचा विरोध होता. पण हा विरोध झुगारून ती आफताब सोबत लिव्ह इन रिलॅशनशिपमध्ये राहत होती. तिने आफताबकडे लग्नासाठी तगादा लावल्यानं त्यानं तिची हत्या केल्याचं समोर आलंय. या प्रकरणात आफताबला अटक करण्यात आली आहे. तसेच, पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.