Afghan Football player Death विमानावरून पडून मृत्यू झालेला झाकी अन्वर अफगाणचा राष्ट्रीय फुटबॉलपटू
अफगाणिस्तानमधील अंगाचा थरकाप उडवणारे व्हीडिओ समोर येत होते, एका व्हीडिओत तर विमानच्या पंखावर बसून काही अफगाण नागरिक देश सोडण्यासाठी मिळेल त्यामार्गे नागरिक पळ काढत होते. याच विमानवर लटकलेल्या दोघांचा विमानतून हजारो फूट खाली पडून तिघांचा मृत्यू झाला.
यातील एकजण हा अफगाणिस्तान फुटबॉल टीममधील युवा खेळाडू होता. पण देश सोडण्यासाठी लाखो लोक काबूल विमानतळाकडे निघाले आणि त्यात हा युवा फुटबॉल पटू झाकी अन्वर देखील होता. इतरांप्रमाणे त्यांने देखील देश सोडण्यासाठी विमानांच्या पंखाना कवटाळून बसला.
ज्या पंखांच्या अधारे त्याने देश सोडण्याचं स्वप्न पाहिलं त्याच पंखांमुळे त्याच्या आयुष्याचे पंख तुटले. ज्या देशासाठी खेळण्याचं स्वप्न पाहिलं तोच देश सोडण्याआधी अन्वरचा असा दुर्दैवी मृत्यू झाला. अफगाण राष्ट्रीय फुटबॉल टीमच्या फेसबुक पोस्टवर याबाबत माहिती देण्यात आली.