Afghanistan Cricket : अफगाण क्रिकेटवरही तालिबानी संकट? T20 विश्वचषकातील सहभागावर प्रश्नचिन्ह
काबुल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानींच्या सत्तेनंतर आता अफगाणिस्तान क्रिकेटचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होत होता. याबाबत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे (ACB) मुख्य कार्यकारी अधिकारी हमीद शिनवारी यांनी म्हटले की, क्रिकेटचं कोणतंही नुकसाना होणार नाही. तालिबानी क्रिकेट खेळ आवडतो आणि ते या खेळाला पाठिंबा देतील. काबूलहून पीटीआयशी बोलताना शिनवारी यांनी आश्वासन दिले की राष्ट्रीय संघातील सदस्य आणि त्यांचे कुटुंबिय सुरक्षित आहेत.
रशीद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब जादरानसारखे स्टार खेळाडू सध्या ब्रिटनमध्ये 'हंड्रेड' स्पर्धेत खेळत आहेत. शिनवारी यांनी म्हटलं की, तालिबान्यांना क्रिकेट आवडते. त्यांनी आम्हाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे. ते आमच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत. आमचे अध्यक्ष सक्रिय आहेत आणि पुढील सूचना येईपर्यंत मी मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.