400 वर्षांनंतर बार्बाडोस झाला स्वतंत्र, ब्रिटनच्या राणीचा 400 वर्षांचा अंमल संपुष्टात
कॅरेबियन बेटांमधल्या बार्बाडोस हे आज जगातलं सर्वात नवं प्रजासत्ताक राष्ट्र ठरलं. गेल्या ४०० वर्षांपासून या बेटावर ब्रिटनच्या राणीचा अंमल होता. ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरी हिला बार्बाडोसच्या प्रमुख पदावरून हटवण्यात आल्याचं सोमवारी मध्यरात्री जाहीर करण्यात आलं. बार्बाडोसची राजधानी असलेल्या ब्रिजटाऊनमध्ये यानिमित्तानं प्रचंड जल्लोषाचं वातावरण दिसून आलं. ब्रिजटाऊन शहरातल्या हिरोज स्क्वेअरमध्ये एका शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.