Corona World : जगभराच कोरोनाचं तांडव, एकाच दिवसात 16 लाख कोरोना रुग्णांची नोंद

Continues below advertisement

Coronavirus Disease : जगभरात पुन्हा एकदा कोरोना महामारीने हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याचं चित्र निर्माण झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओने पुन्हा एकदा सावधानतेचा इशारा दिला आहे. कोरोना महामारीचा पुन्हा एकदा झपाट्याने प्रादुर्भाव वाढण्याचे संकेत जागतिक आरोग्य संघटनेनं दिले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत 11 टक्केंनी वाढ झाली आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्याने वाढत आहे. फ्रान्समध्ये मागील 24 तासांत तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. तर अमेरिकामध्ये मागील 24 तासांत साडेचार लाख रुग्णांची नोंद झाली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram