Cyber Security : अमेरिकेतील 14 कंपन्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील 5 लाख महिलांना देणार प्रशिक्षण
Continues below advertisement
अमेरिकेतील १४ नामांकित कंपन्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील ५-५ लाख महिलांना प्रशिक्षण देणार आहेत. यात अॅपल, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि व्हिसासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. महिला व मुलींना शिक्षणाची पुरेशी संधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यात डेटा, क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि सायबर सिक्युरिटीसारख्या क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे. बायडेन सरकारच्या धोरणांनुसार, भारतासह १३ देशांतील महिलांना या कार्यक्रमाचा लाभ देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ करताना अमेरिकी वाणिज्य सचिव जिना रायमोंडो म्हणाले, येत्या दहा वर्षांत सर्व महिलांना प्रशिक्षित करण्याचे लक्ष्य आहे. यामुळे ऑनलाइन गाेपनीयता भक्कम होईल व सायबर चोरी रोखण्यात यश मिळेल.
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Women Empowerment Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS US Companies Indo-Pacific Region