UP-Bihar Sunstroke : युपी बिहारमध्ये 100 हून अधिक जणांचा मृत्यू,400 जणांवर उपचार सुरु : ABP Majha

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेल्या तीन दिवसांत १००हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू उष्माघातानं झाले असावेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र यामागे दूषित पाणी हे देखील कारण असू शकतं, असं उत्तर प्रदेशच्या एका वरिष्ठ सरकारी डॉक्टरचं मत आहे. लवकरच बलियामधील पाण्याचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. 
उत्तर प्रदेशच्या एकट्या बलिया जिल्ह्यात ५४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४००हून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे, बिहारची राजधानी पाटण्यामध्ये गेल्या २४ तासांत ३५ जणांचा मृत्यू झाला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola