Global Teacher Award | ग्लोबल टिचर्स पुरस्काराने सन्मानित झालेल्या रणजीतसिंह डिसले यांचं कार्य

Continues below advertisement
सोलापूर : माझा झालेला हा सन्मान केवळ माझा नसून राज्यातील आणि देशातील सर्व शिक्षकांचा आहे. सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा हा सन्मान आहे. वार्की फाऊंडेशनचे मी मन:पूर्वक आभार मानतो. माझ्या कामात सहकार्य केल्याबद्दल राज्य सरकारचेही आभार, असं रणजीत डिसले यांनी म्हटलं. पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडकरता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल, असंही डिसले यांनी म्हटलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram