Explainer Video | कृषी कायदा आंदोलनामुळे पंतप्रधान मोदींच्या 'पोलादी नेता' या प्रतिमेला तडा जाईल?
Continues below advertisement
नवी दिल्ली : दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला अखेर पोलिसांची परवानगी मिळाली आहे. प्रजासत्ताक दिनाला राजपथावर सैन्याची परेड तर दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा पाहायला मिळणार आहे. सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर, गाजीपुर बॉर्डर व शहाजापूर बॉर्डर येथून ट्रॅक्टर्स दिल्लीमध्ये येणार आहेत. शेतकऱ्यांना आउटर रिंग रोडवर एकत्रित मोर्चा करायचा होता, मात्र त्याऐवजी दिल्लीतल्या अंतर्गत रस्त्यांवर मर्यादित प्रवेशाला परवानगी देण्यात आली आहे. सर्व सीमांवरचे ट्रॅक्टर एकत्रित येणार नाहीत तर जिथपर्यंत परवानगी दिली आहे तिथून ते आपापल्या ठिकाणी परत माघारी जाणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Rahul Kulkarbi Explainer Video Indian Farmers Agriculture Bill Pass Farmer Protest Delhi Farmers Special Report New Delhi Delhi Agriculture Bill Maharashtra Farmers Farmer Protest