Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट

Continues below advertisement

बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राज्यातील संभाव्य राजकीय उलथापालथीची....ठाकरेंचे ३ खासदार दिल्लीत पोहोचल्यानं ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पुन्हा बळ मिळालंय...विशेष म्हणजे एकनाथ शिंदे स्वत दिल्लीकडे रवाना झालेत...भाऊसाहेब वाकचौरे, संजय देशमुख, संजय जाधव हे तिन्ही खासदार दिल्लीकडे रवाना झालेत...तर संजय दीना पाटील सध्या मुंबईत असल्याची माहिती आहे...ओमराजे निंबाळकर हे पुण्यात आहेत तर नागेश पाटील आष्टीकर हे नॉट रिचेबल असल्याचं कळतंय..आष्टीकर थोड्या वेळापूर्वी मतदारसंघात असल्याची माहिती समोर आलीय.. वेगळा गट स्थापन करण्यासाठी खासदार उद्याच दावा करु करतील अशी शक्यता आहे... .दरम्यान एकीकडे खासदारांनी दिल्लीकडे धाव घेतलेली असतानाच ठाकरेंच्या सेनेत जोरदार हालचाली सुरु झाल्यात...अनिल देसाई, संजय राऊत, आणि अरविंद सावंत हे सध्या संकटमोचकांच्या भूमिकेत आहेत...हे तिन्ही खासदार दिल्लीकडे रवाना झालेत...पक्षात फूट पडल्यास पुढील कायदेशीर पावलं नेमकी काय असावीत यासाठी हे तिन्ही खासदार पुढची रणनीती आखतील अशी माहिती आहे...त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी आजचा दिवस खऱ्या अर्थानं अग्निपरीक्षेचा ठरतोय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola