Maharashtra Politics | राज्यात ठाकरे-पवार पॅटर्न येण्याची शक्यता,सत्तेसाठी काँग्रेसला सोबत घेणार का?

राज्य मंत्रीमंडळ बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात पार पडली. या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास ही बैठक चालली. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक नवी दिशा राज्याला देण्याबाबत यामध्ये चर्चा झाली, राज्यात पुढे येणाऱ्या निवडणुका एकत्रित लढण्याची खलबतं सध्या सुरू आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र निवडणुका लढवण्याची माहिती आहे. आता प्रश्न हा आहे की यासर्वामध्ये काँग्रेसचं स्थान नेमकं काय असेल आणि काय आहे काँग्रेसची भूमिका.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola