Ahmednagar मध्ये चौंडी इथं आज Sharad Pawar आणि Gopichand Padalkar आमने सामने येणार ? : ABP Majha

Continues below advertisement

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्तानं अहमदनगरच्या चौंडी इथं आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आमनेसामने येण्याची शक्यता आहे. अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या चौंडी इथं आज पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. या ठिकाणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री राम शिंदे अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. शरद पवारांवर सातत्यानं कडवी टीका करणारे पडळकर चौंडीमध्ये येणार असल्यानं दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेही आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसनं या जयंती सोहळ्याला राजकीय स्वरुप दिल्याचा आरोप भाजपनं केलाय. त्यामुळे राजकारणही तापलं आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram