Inflated Electricity Bill | तुमचं वीजबिल का वाढतंय? ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली माहिती

मुंबई : लॉकडाऊनदरम्यान वाढलेलं वीज बिल ग्राहकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. यासंदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेत लोकांच्या मनतील प्रश्नांची उत्तरं दिली. लॉकडाऊनच्या काळात एप्रिल आणि मे महिन्यात वर्क फ्रॉम होममुळे वीज वापरात वाढ झाली आहे. त्यामुळे जून महिन्याच्या वीज बिलात वाढ दिसून येत आहे, असं नितीन राऊत यांनी सांगितलं. थकीत वीजबिल तीन महिन्यांच्या टप्प्यात भरण्याची मुभा ग्राहकांना देण्यात येत आहे. तसेच संपूर्ण वीजबिल भरल्यास 2 टक्के सूट मिळणार असल्याची माहितीही नितीन राऊत यांनी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola