Majha Vishesh | फक्त एका भेटीमुळे ठरवणार आमिरला गुलफाम हसन? एका भेटीवर ही 'सरफरोशी' का? माझा विशेष
नवी दिल्ली : आमिर खान सध्या आपला आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्ढाच्या शुटिंगसाठी तुर्कीमध्ये गेला आहे. तिथे तो आपल्या आगामी चित्रपटाचं शुंटिंग करणार आहे. काही दिवसांपूर्वी तुर्कीतून त्याचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये तो तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नी एमीन एर्दोगनसोबत दिसून आला आहे. या फोटोवरून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.
आमीर खानसोबतचे फोटो एमीन एद्रोगनने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहे. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, 'मला जगप्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांना भेटण्याची सुवर्णसंधी मिळाली. फिल्ममेकर आणि दिग्दर्शक इस्तानबुलमध्ये आहेत. मला हे जाणून घेऊन आनंद होत आहे की, आमिर लवकरच आपला आगमी चित्रपट 'लाल सिंह चड्ढा'चं शुटिंग तुर्कीतील वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण करतील.'