Sangli Corona | रोल मॉडेल ठरलेला सांगली जिल्हा कोरोनाचं फेल मॉडेल कसा झाला? स्पेशल रिपोर्ट
सांगली जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दिवसभरात तब्बल 998 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.त्यामुळे आता पर्यंतचे कोरोना रुग्ण संख्येचे सर्व रेकॉर्ड ब्रेक झाले आहेत. तर 30 जणांचा मृत्यू झाला आहे.सोमवारी आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपैकी तब्बल 223 रुग्ण हे सांगली महापालिका क्षेत्रातील आहेत, ज्यामध्ये 138 सांगली शहरातील तर 85 हे मिरज शहरातील आहेत.तर मिरज आणि वाळवा तालुक्यात प्रत्येकी 170 रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सोमवारी दिवसभरात तब्बल 375 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत.