Mahesh Kothe | महेश कोठेंचा राष्ट्रवादी प्रवेश होता होता का थांबला?शरद पवारांनी ट्वीट डिलीट का केलं?
सोलापूर/ मुंबई : सोलापूर महानगरपालिकेत मोठी राजकीय उलथापालथ काल झालेली पाहायला मिळाली. पालिकेत प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या शिवसेनेला मोठा झटका बसला. विरोधीपक्ष नेते महेश कोठे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं सांगत शिवसेनेला राम राम ठोकला. कोठे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं. कोठे यांचा आज राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश होणार अशी चर्चा होती. शरद पवार यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून महेश कोठे यांचा प्रवेश झाला अशी पोस्ट देखील आली. मात्र नंतर ती पोस्ट डिलिट करण्यात आली. आज एकूणच महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशवरून अत्यंत नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या. कोठेंचा राष्ट्रवादी प्रवेश मात्र झालाच नाही. त्यामुळं कोठे नेमके कोठे? असा सवाल उपस्थित होत आहे.