विद्यापीठ परीक्षेतील अडचणींमुळे विद्यार्थ्यांवर रडण्याची वेळ, ऑफलाईन परीक्षेसाठी कॉलेजमध्ये गर्दी

तांत्रिक अडचणींमुळे मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था (आयडॉलच्या) न होऊ शकलेल्या व पुढील सर्व परीक्षा 19 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणार आहेत. याबाबतीत पुढील परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॅा. विनोद पाटील यांनी सांगितले. आज झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. सुधारीत वेळापत्रकानुसार परीक्षा घेताना संभाव्य तांत्रिक अडचणी उद्भवणार नाही तसेच यासाठी पर्यायी व्यवस्थाही तयार केली जाणार असून विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी करू, नये असेही संचालक डॅा. विनोद पाटील यांनी सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola