बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाणांशी चर्चा,काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी कुणाची वर्णी?
मुंबई : पक्षांतर्गत राजकारणामुळे बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. काल बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्याची माहिती मिळत आहे. मात्र मी अद्याप राजीनामा दिलेला नाही, पण जर तरुणांना संधी मिळणार असेल तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहिन, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीवारीनंतर एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिली आहे.
Tags :
Balasaheb Thorat Congress Internal Dispute Congress Dispute Sunil Kedar Prithviraj Chavan Congress President Priyanka Gandhi Sonia Gandhi Rahul Gandhi Indian National Congress