Majha Vishesh | शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून थिल्लरपणा कोण करतंय? ठाकरे-फडणवीसाच्या वादाचं पाणी डोक्यावरून?
Continues below advertisement
"ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. मात्र आठ दिवस झाले, नुकसानग्रस्त भागात प्रशासन पोहोचलेलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर कोणालाही मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांकडून राजकीय स्टेटमेंटची अपेक्षा नाही. सरकारचा नाकर्तेपण झाकण्याची जबाबदारी शरद पवारांवर आहे," अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. उस्मानाबादमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचा वर्षभरापूर्वीचा व्हिडीओही दाखवून त्यांनी घेतलेल्या भूमिकेची आठवण करुन दिली.
Continues below advertisement
Tags :
Solapur Maharashtra Rain Update Uddhav Thackeray Maharashtra Flood Political Leaders Tour CM Thackeray Visits Rain Affected Solapur Devendra Fadnavis