विधानपरिषदेच्या जागांवरून संजय राऊतांचा घणाघात, 'त्या '12 नावांना राज्यपाल कधी मंजुरी देणार?
Continues below advertisement
नोव्हेंबर महिन्यात महाविकास आघाडीने बारा उमेदवारांची नावं राज्यपालांकडे सुपूर्द केली पण अद्याप त्यावर कुठलाही निर्णय झाला नाही त्यामुळे शिवसेनेनं या मुद्द्यावरून राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं आहे. महाविकास आघाडी सरकारकडून 6 नोव्हेंबर रोजी विधानपरिषदेसाठीच्या 12 नावांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आला होता. शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुख यांनी यासंदर्भात राज्यपालांची भेट घेऊन बारा नावांची यादी सोपवली. यासोबत 21 नोव्हेंबरपर्यंत यादी मंजूर करावी अशी विनंतीही करण्यात आली होती.
Continues below advertisement
Tags :
Vidhan Parishad Nomination Bhagatsingh Koshyari Governor Special Report Vidhan Parishad Vidhan Parishad Election Sanjay Raut