Bogus Soybean Seeds | बोगस बियाण्यांविरोधात युवक काँग्रेस आक्रमक, दोषींवर कारवाई कधी होणार हा सवाल
'महाबीज'च्या अकोल्यातील मुख्य कार्यालयावर युवक काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन केलं आहे. बोगस सोयाबीन प्रकरणाच्या विरोधात काँग्रेसने हे आंदोलन केलं आहे. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा या आंदोलनात समावेश होता. आंदोलकांनी मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यालयात ठिय्या धरला. यावेळी आंदोलकांनी वाया गेलेलं सोयाबीनचं बियाणं मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या टेबलावर फेकत आपला संताप व्यक्त केला. या घोटाळ्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.