Antigen Test Procedure | अॅंटिजन टेस्ट कशी केली जाते? तब्बल 15मिनिटात कसा येतो कोरोनाचा अहवाल? पाहा!
Continues below advertisement
बहुतेक सर्व जिल्ह्यात रॅपिड अॅंटिजन टेस्टला सुरुवात झाली आहे. त्या टेस्टचा अहवाल केवळ 15 मिनिटांत येतो. आज ॲंटिजन टेस्ट करण्यासाठी एबीपी माझाचे प्रतिनिधी तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या जेलच्या प्रांगणात गेले होते. टेस्ट आणि हे कव्हरेज सुरू असतानाच उस्मानाबाद मधल्या ह्या तात्पुरत्या जेल मध्ये 17 जण कोरोनाबाधित असल्याचं आढळून आलं. त्यात सहा कर्मचारी आणि 11 कैदी आहेत. काल या जेल मधले सहा जण पॉझिटिव्ह होते. दोन दिवसात तात्पुरत्या जेल मध्ये 23 जण कोरोना पॉझिटिव्ह आलेत. या ॲंटिजन टेस्टमुळेच कैद्यांच्या पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल तात्काळ आला. कशी होते ही रॅपिड ॲंटिजन टेस्ट पाहा!
Continues below advertisement