Final year Exam अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी कोणते दोन पर्याय उपलब्ध? येत्या दोन दिवसात होणार निर्णय
अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांना सर्व सत्रांच्या सरासरीनुसार गुण देणं आणि त्याचवेळी ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी वाढवण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ऐच्छिक परीक्षा घेण्याचा एक पर्याय सरकारच्या विचाराधीन आहे. हा पर्याय परीक्षा समर्थक आणि विरोधक या दोन्ही बाजूंचेही काही प्रमाणात समाधान करणारा असल्यानं तोच सुवर्णमध्य ठरण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आणखीही काही पर्याय आणि कायदेशीर बाजूंचा विचार सुरु आहे. याचा अंतिम निर्णय येत्या दोन दिवसात होणार आहे.
Tags :
University Grants Commission Last Year Exam University Exam Maharashtra Lockdown Uday Samant UGC Covid 19