Matoshree 2 Sanjay Nirupam | मातोश्री 2 साठी उद्धव ठाकरेंनी किती रोख रक्कम दिली? संजय निरुपम यांचा सवाल
मातोश्री-2 साठी उद्धव ठाकरेंनी किती रोख रक्कम दिली? असा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उपस्थित केला आहे. ठाकरे कुटुंबाने या जागेची खरेदी राजभूषण दीक्षित यांच्याकडून केली होती. सध्या दीक्षित यांची ईडी चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर कोट्यवधीच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. अशा व्यक्तीकडून मातोश्री-2 ची केवळ 5.80 कोटींमध्ये खरेदी करण्यात आली. मात्र या जागेचं बाजारमूल्य कैकपट अधिक असल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे. त्यामुळे या डीलची चौकशी करण्याची मागणी निरुपम यांनी केली आहे.