Unseasonal Rain | पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला अवकाळी पावसानं झोडपलं, शेतकरी संकटात
मुंबई : हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला मध्यरात्री अवकाळी पावसानं झोडपलं. सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद अकोला, परभणी, भंडारा या जिल्ह्यांसह अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. सांगलीतल्या अवकाळीच्या धुमाकुळानं द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आलाय. अनेक भागांमधील द्राक्षाची निर्यात झाली नाही. त्यामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेत आहे. तिकडे परभणीतल्या पावसानं ज्वारी, हरभरासारख्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. वाशिममध्ये पावसाच्या सरी कोसळल्या.