West Bengal Election 2021 | पश्चिम बंगालमध्ये राज्यमंत्री झाकीर हुसेन यांच्यावर बॉम्बहल्ला
मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालमधील राजकारण तापलं असताना आता ममता सरकारमधील एका मंत्र्यांवर बॉम्बहल्ल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात निमटीटा रेल्वे स्टेशनवर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात कामगार राज्यमंत्री झाकीर हुसैन गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्री हुसैन यांच्यासह आणखी दोन जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत. ही घटना काल रात्री घडली असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे देशाचे गृहमंत्री अमित शाह आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याआधी घडलेल्या या घटनेमुळं प्रशासन सतर्क झालं आहे.
Tags :
Bomb Attack Zakir Hussain BJP Kolkata Bengal Election Bjp West Bengal JP Nadda Tmc Mamata Banerjee West Bengal Party Workers Election BJP