Weather Update : वातावरणात बदल होऊन मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी,थंडीची लाट पुन्हा पसरली : ABP Majha

उत्तरेकडील राज्यात आलेली थंडीची लाट ओसरतेय असं वाटल्यानंतर पुन्हा एकदा वातावरणात बदल होऊन मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झालीय. आणि थंडीची लाट पुन्हा पसलेय. जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या डोंगराळ भागात बर्फवृष्टी होतअसल्यानं राजधानी दिल्लीत तापमान १० अंशांच्याही खाली घसरलंय. उत्तर भारतातल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रालाही हुडहुडी भरलेय.  उत्तर भारतातल्या थंडीच्या लाटेमुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 10 अशांच्या खाली जाण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola