Weather Update : राज्यात उद्यापासून पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
राज्यात उद्यापासून काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे, कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यात सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन गारवा घटला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार 16 फेब्रुवारीपासून राज्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस होणार आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.