Thane Water Logging | ठाण्यात मुसळधार पाऊस, घोडबंदर रोडवर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी
ठाण्यात आज तासभर मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळेच ठाण्यात अनेक ठिकाणी पाणी साचलं. ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील आर मॉल परिसरात हायवेवर पाणी साचलं. एकीकडे मेट्रोचं काम सुरू असल्याने उर्वरित जागेतून गाड्यांना प्रवास करावा लागत आहे, त्यातच पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली.