Yavatmal Washim : यवतमाळ वाशिममध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी !
abp majha web team
Updated at:
21 Apr 2024 01:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppYavatmal Washim : यवतमाळ वाशिममध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी ! देशात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. प्रत्येक पक्ष प्रचाराचा धुराळा उडवत आहे. मात्र या प्रचाराच्या रणधुमाळीत युवकांच्या प्रश्नाला कुठेच वाचा फोडण्यात येत नसल्याची खंत युवकांनी बोलून दाखवली. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात मोठी बेरोजगारी असून कुठलेच मोठे उद्योग नाहीत. जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे. पदभरती ही केवळ कागदावर राबवली जात असून अद्यापही निम्म्यापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. सुशिक्षित बरोजगारी वाढत चालली आहे. याबाबत युवकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश फाळके यांनी