Washim : संभाजी भिडेंना वंचित बहुजन आघाडीचा विरोध, भिडेंच्या मार्गावर रास्तारोको
शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे आज वाशिम दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याला शनिवारप्रमाणं आजही वंचित बहुजन आघाडीनं विरोध केला आहे. संभाजी भिडे ज्या मार्गावरुन वाशिमच्या दिशेनं जाणार आहेत, त्या मार्गावर वंचितच्या कार्यकर्त्यांकडून रास्तारोको करण्यात आला.