Washim : वाशिममध्ये शेतकरी चिंतेत, खोडकिडीमुळे पिकांचं मोठं नुकसान ABP Majha
आत्ताच कुठे रब्बी पिकांना पोषक वातावरण मिळतंय ना मिळतंय तोवर अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवलं होतं. त्यात आता विविध रोगांची भर पडलीय.रब्बी पिकातील प्रमुख पीक गहू पिका पिकावर खोडकिडीमुळे पिकांचं नुकसान होतंय. त्यामुळे शेतकऱ्यासमोर पुन्हा एक मोठं आव्हान आहे. खोडकिड ही पिकाच्या गाभ्यात शिरुन गाभा पोखरुन पिकांची नासाडी करते. त्यामुळे आता याचा कसा बंदोबस्त करणार असा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे.