Poharadevi Narendra Modi Welcome Prepration : पंतप्रधान वाशिम दौऱ्यावर; सभास्थळी जोरदार तयारी

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येतायत... . वाशिममधून मोदी, कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित, २३ हजार ३०० कोटींच्या  उपक्रमांचा शुभारंभ करतील.. तर ठाण्यात ३२ हजार ८०० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान मोदी करणार आहेत.. याशिवाय बीकेसी ते आरे, दरम्यान धावणाऱ्या भूमिगत मेट्रो ट्रेनला संध्याकाळी ६ वाजता पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील.. तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधीं आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. काल राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा होणार होता. मात्रकाल काही कारणास्तव  राहुल गांधींचा दौरा रद्द झाला होता. आज राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे. तर तिकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. सुभेदारी विश्रामगृहावर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका राज ठाकरे घेणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola