Washim : मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात १० महिलांच्या शस्त्रक्रिया, वाशिममधला धक्कादायक प्रकार
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे डॉक्टरांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात १० महिलांच्या शस्त्रक्रिया केल्यायत. वाशिमच्या राजाकिन्ही आरोग्यवर्धनी केंद्रात जनरेटर, इनव्हर्टरची सोय नसल्याने डॉक्टरांवर ही वेळ आली. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने १० महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मोबाईल टॉर्चच्या मदतीने केल्यायत. डॉक्टरांनी ही तत्परता दाखवली असली तरी, आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार, हॉस्पिटलला विजेच्या पुरेसा पुरवठा न होणं या गोष्टी आरोग्य यंत्रणेची लक्तर वेशीवर टांगणाऱ्या तर आहेतच. पण, अनेकांच्या जीवाशी खेळही आहे. असा संताप रुग्ण आणि नागरिक व्यक्त करतायत.