PM Narendra Modi Speech Poharadevi Washim : इंग्रजांनी बंजारा समाजाला गुन्हेगार ठरवलं

Continues below advertisement

PM Narendra Modi Visit in Poharadevi Washim : ज्यांना आजतगायत कोणी विचारलं नाही, त्यांना हा नरेंद्र मोदी आज पूजतो आहे. बंजारा समाजाने भारताच्या निर्मितीत, इथल्या संस्कृतीत फार मोठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कला, संस्कृती, राष्ट्रभक्ती, व्यापार इत्यदी प्रत्येक क्षेत्रामध्ये या समाजाच्या महापुरुषांनी, महान विभूतींनी  देशासाठी काय नाही केलं? अनेकांनी समाजासाठी आपले सर्वस्व त्यागले. आमच्या बंजारा समाजातील कित्येक साधुसंत, महंतांनी राष्ट्रभक्ती आणि धर्मासाठी नवी चेतना दिली. मात्र, स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी या संपूर्ण समाजाला अपराधी घोषित केलं होतं. मात्र देशाच्या स्वातंत्र्यानंतर या देशाची जबाबदारी होती की, बंजारा समाजाची चिंता केली पाहिजे, त्यांना योग्य तो सन्मान दिला पाहिजे. मात्र तसे झाले नाही. त्यावेळच्या काँग्रेस (Congress) सरकारने नेमकं काय केलं? काँग्रेसच्या त्यावेळच्या सरकारने उलट या समाजाला मुख्य धारेपासून वेगळं केलं.

स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पार्टीवर ज्या परिवाराने ताबा मिळवला. त्यांची विचारधारा ही आधीपासूनच विदेशी राहिली आहे. त्यांना कायम वाटत राहिले आहे की, भारतावर कायम एका कुटुंबाचीच मक्तेदारी राहिली पाहिजे. कारण हा हक्क त्यांना ब्रिटिशांनी दिला होता. म्हणून त्यांनी बंजारा समाजाप्रती आपली अपमानजनक वागणूक कायम ठेवली. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modiयांनी वाशिमच्या (Washim) सभेतून काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram