Wardha : हिंगणघाटमध्ये RSS च्या जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांना मारहाण
Continues below advertisement
नागरिकाला मारहाण करण्याचा प्रकार घडलाय. जेठानंद राजपूत असं त्यांचं नाव असून ते आरएसएसचे वर्धा जिल्हा संघचालक असल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय. वर्ध्यावरून बसने प्रवास करत असताना बसमधल्या युवकांनी हिंगणघाटच्या नांदगाव रस्त्यावर जेठानंद राजपूत यांना बसमधून खाली उतरवून मारहाण केली. या घटनेनंतर हिंगणघाट शहरात रात्री तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर नागरिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून आरोपीवर कारवाईची मागणी केली. प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत एका आरोपीला ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरु आहे.
Continues below advertisement