Wardha BJP OBC Jagar Yatra : सेवाग्राममधून भाजपची 11 दिवसांची ओबीसी जागर यात्रा निघणार
Continues below advertisement
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त वर्ध्याच्या सेवाग्राम इथल्या बापूकुटी आश्रमात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. पहाटे सर्वधर्म समभाव प्रार्थना, रामधून, आश्रम परिसराची गांधीजींच्या अनुयायांकडून स्वच्छता करण्यात आली. यावेळी चरख्यावर अखंड सूतकताई करत महात्मा गांधी यांना आदरांजली वाहली जात आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे या देखील सेवाग्राम इथे पोहोचणार आहेत, याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी.
Continues below advertisement