Wardha Hospital Fire : शॉर्टसर्किटमुळे रुग्णालयात भीषण आग, नागरिकांच्या सतर्कतेमुळ टळला अनर्थ
समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयातील नवीन बांधकाम सुरु असलेल्या भागात शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली.. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास लक्षात आली..बघता बघता आगीने रुद्ररूप धारण केले होते. दरम्यान ग्रामीण रुग्णालयातील काही कर्मचारी आणि नागरिकांना ही आग दिसताच प्राथमिक अग्नी शामक सिलेंडरच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. या आगीत मोठे नुकसान झाले नसले तरी संभावित मोठा अनर्थ नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळलाय..