वर्ध्यातील गोलबाजारात लागलेल्या आगीत 20 ते 22 फळ-भाज्यांची दुकानं खाक, मदत देण्याचं सरकारचं आश्वासन
Continues below advertisement
वर्धा येथील गोल बाजार परिसरात लागलेल्या आगीच्या ठिकाणी पालकमंत्री सुनील केदार यांनी भेट दिली. इथं अचानक लागलेल्या आगीत फळ, भाजी विक्रेत्यांची दुकान, हातगाड्या जळल्या. त्यात लाखो रुपयांच नुकसान झालं. मंत्री सुनील केदार यांनी आगीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेत व्यथा जाणून घेतली. अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होत असताना पालकमंत्री तातडीनं मुबंईहुन आले आणि नुकसानग्रस्तांची भेट घेतली. मदत देण्यासह व्यवसाय उभे करण्यास सहकार्य करण्याचंही आश्वासन पालकमंत्री सुनील केदार यांनी दिलं आहे.
Continues below advertisement