Wardha Birthday Boy : बर्थडे जीवावर बेतू शकतो, फायर गनमुळे बर्थडे बॉयच्या चेहऱ्याजवळच भडका उडाला
Continues below advertisement
वाढदिवसाला केक कापताना विविध स्प्रे आणि फायर गन चा वापर करणार असाल तर पुन्हा विचार करा. कारण वर्धा शहरात एक भीषण घटना घडली आहे. स्प्रे आणि फायर गनमुळे बर्थडे बॉयच्या चेहऱ्याजवळच भडका उडाला. वर्ध्याच्या सिंदी मेघे येथे हा धक्कादायक प्रकार घडला. ऋतीक वानखेडे असं बर्थडे बॉयचं नाव असून तो काल सायंकाळी आपल्या मित्रांसोबत केक कापत होता. केक कापतांना स्प्रे तोंडावर मारला गेला. याच वेळी 'फायर गन' मधून निघालेली ठिणगी स्प्रे वर पडल्याने आग लागली. सुदैवानं ऋतिक यातून बचावला, आणि मोठा अनर्थ टळला
Continues below advertisement