#WadhwanCase | वाधवान प्रकरणी अमिताभ गुप्तांकडून पत्र स्वत: दिल्याचं कबूल, गृहमंत्र्यांची माहिती
लॉकडाऊनमध्ये गृहविभागाच्या विशेष सचिवांचं पत्र घेऊन महाबळेश्वरला गेलेल्या वाधवान कुटुंबाचा ताबा सीबीआयकडे दिल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिली. वाधवान कुटुंबाला पत्र देणारे गृहविभागाचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांचीही चौकशी पूर्ण झाली असून गुप्ता यांनी कुणाच्याही दबावाविना पत्र दिल्याचं कबूल केलं. अमिताभ गुप्ता यांनी स्वत: पत्र दिल्याचं कबूल केलं आहे अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.
Tags :
Wadhwan Family Wadhwan Controversy Kapil Wadhwan Maharashtra Lockdown Anil Deshmukh Sharad Pawar Devendra Fadnavis