Pune Traffic Chaos | पुण्यात दुचाकीवर चार जणांचा धोकादायक प्रवास, व्हिडिओ व्हायरल
पुण्यातील नवले पुलावर दुचाकीवर चार जणांनी प्रवास केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. दुचाकीचा नंबर स्पष्टपणे दिसत नसल्याने मालकाची ओळख पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.