गोरेवाडा प्राणी उद्यानाला बाळासाहेबांचं नाव नको,विदर्भवाद्यांकडून काळ्या झेंड्यांनी निदर्शनं
Continues below advertisement
नागपूर : दिवंगत बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या उद्घाटनाच्या दिवशी नागपुरात गोंधळ, विरोध, नाराजी आणि सुरक्षेच्या नावावर पोलिसांकडून अभूतपूर्व बंदोबस्त लावल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या नावाला होणाऱ्या विरोधाचे सूर दडपशाहीने दाबले जात आहेत का? अशी शंका निर्माण झाली आहे.
नागपूरच्या वेशीवर 1 हजार 941 हेक्टर क्षेत्रात विस्तारलेले गोरेवाडा प्राणी उद्यान आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने या उद्यानाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे जाहीर केले आणि नागपुरात विरोधाचे स्वर उभे होऊ लागले. आदिवासी समाजाने गोरेवाडा परिसर ऐतिहासिक दृष्ट्या आदिवासी समाजाची वस्ती राहिली असून मागील सरकारने गोरेवाडा उद्यानाला गोंडवाना हे नाव देण्याचे तत्वतः मान्य केल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा विरोध केला.
Continues below advertisement
Tags :
Vidarbhawadi Gorewada Zoo Gorewada Nagpur Zoo Cm Thackeray Zoo Nagpur Vidarbha Uddhav Thackeray