APMC Market Election | नवी मुंबई कृषीउत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आघाडीचं वर्चस्व, भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
महाराष्ट्रातील शिखर बाजार समिती असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपाच्या हाती भोपळा लागला आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारत कृषी उत्पन्न बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित केले आहे. 18 पैकी 16 संचालकांच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.