Sanjay Raut on ED | त्या 'वर्षा संजय राऊत', त्या समर्थ आहेत,ED चौकशीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज चौकशीसाठी ED कार्यालयात हजर झाल्या आहेत. गेल्या जवळपास चार तासांपासून त्यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरु आहे. या चौकशीसंदर्भात संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, चौकशी सुरु आहे. पूर्ण होऊ द्या मग बोलू. कोणत्याही प्रकारे तपास सुरु असताना शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही. हे कोण करतंय हे सगळ्यांना माहिती आहे, असं राऊत म्हणाले. तुम्ही चौकशीसाठी सोबत जाणार का? असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, त्या वर्षा संजय राऊत आहेत. त्या समर्थ आहेत. मी ऑफिसला बसलो होतो तेव्हा मला कळलं की त्या चौकशीसाठी गेल्या आहेत. काही माहिती जर सरकार मागत असेल तर ती देणं आपलं कर्तव्य आहे. जी माहिती हवी आहे ती आधीही दिली आहे पुढेही देऊ, असं राऊत म्हणाले.
Continues below advertisement