Vainganga River Flood | वैनगंगा नदीला महापूर, गावातील लोकांना घराच्या छतावर आश्रय घेण्याची वेळ
Continues below advertisement
भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. आता जरी पावसाने उसंत घेतली असली तरी जिल्ह्यातील वैनगंगा, बावनथडी नदीला पूर आला असून गोसेखुर्द धरण, बावनथडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. तरी पाऊस इतका होता की नदी काठावरील गावात पाणी शिरलं आहे, तर काही गावात लहान मुलं गावात नाव (बोट) चालवताना दिसत आहेत. या पावसामुळे सगळ्यात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे, नदी काठावरील शेतीमध्ये पाणीच पाणी दिसत आहे. शेतीला तलावाचं स्वरूप आल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. त्यामुळे शासनांनी लवकर पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
Continues below advertisement